स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी: डॉ.धाटे

स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी: डॉ.धाटे पत्रकार संघातर्फे प्रसार माध्यमातील महिलांचा सत्कार

स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी: डॉ.धाटे

स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात
प्रत्येकाच्या घरातून व्हावी: डॉ.धाटे
पत्रकार संघातर्फे प्रसार माध्यमातील महिलांचा सत्कार  
सोलापूर, दि.8-केवळ एक दिवस महिला दिन साजरा करून स्त्री-पुरुष समानता येणार नाही तर त्याची सुरुवात ही प्रत्येकाच्या घरातून व्हायला हवी. नैसर्गिकरित्या ज्यादिवशी पुरुष घरातील कामे महिलांच्याबरोबरीने करायला लागतील त्यादिवशी  सर्वत्र स्त्री-पुरुष  
समानता दिसेल, असा विश्वास पोलीस  उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी व्यक्त केला. 
मंगळवारी,  सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध  प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी  प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. धाटे बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या  पत्नी छाया बैजल या होत्या.याप्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. किरण सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी तळवळकर यांनी केले.
यावेळी डॉ.सारडा यांनी महिलांना कौटुंबिक ऐक्याचे महत्त्व सांगून आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे आणि त्यासाठी 
दररोज आहार कसा व काय घ्यावा,व्यायाम'प्राणायाम योगासन आणि फळांचे महत्त्व सांगितले. काही महिला प्रतिनिधींनीही प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करून 
महिला दिनाचे महत्व विषद केले. 
तर बैजल यांनी आई-वडिलांनी मुलगा- मुलगी असा भेद  न मानता माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून प्रत्येक महिलेने काम करायचे ठरविले तर घरची जबाबदारी कोण पार पाडणार याकडेही लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सुरवसे यांनी केले तर आभार प्रमिला चोरगी यांनी मानले.
*पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रसारमाध्यमातील महिला प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे ,छाया बैजल, डॉ.किरण सारडा व अन्य.