डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते उपायुक्त पांडे यांचा सन्मान

upaukpandesatkar

सोलापुर, 24 - महापालिकेचे पर्यावरणप्रेमी उपायुक्त धनराज पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्यावतीने होटगी मठाचे अध्यक्ष धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रथम पांडे यांनी सपत्निक महास्वामीजींची पादपुजा केली.त्यानंतर महास्वामीजींनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभशिर्वाद दिले.
    यावेळी बोलताना महास्वामींजी म्हणाले पांडे साहेबांचे  कार्य हे पर्यावरण पुरक असुन स्मशानभुमीची स्वच्छता करुन त्या ठिकाणी झाडे लावण्याचे कार्य हे आर्दशवत आहे असे सांगितले.

यावेळी आरोग्यधिकारी डॉ.लोहारे,सिध्देश्वर पंच कमिठीचे विश्वस्त डॉ.राजेंद्र घुली,बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे,सुनिल शरणार्थी,मंगेश स्वामी,कैलास जेऊरे,अनिल व्रजेकर,गुरुनाथ निंबाळे,प्रतिष्ठानचे संचालक मंडळ व प्रतिष्ठीत उपस्थित होतै.